शिवसेनेच्या रडारवर मुंबईतले "बिल्डर्स'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई - स्वतःच्या फायद्यासाठी मुंबईत अनेक विभागांत बांधकाम व्यावसायिक संबंधित विभागाचे नाव बदलत असल्याने या बांधकाम व्यावसायिकांना धडा शिकवा, असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगरसेवकांना दिले. यामुळे, भारतीय जनता पक्षाशी संबंधित अनेक बांधकाम व्यावसायिक आता मराठीच्या नावाखाली शिवसेनेच्या रडारवर आल्याचे संकेत आहेत. शिवसेना भवनमध्ये आयोजित पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बांधकाम व्यावसायिकांनी एक महिन्यात बदललेल्या पाट्या काढून मूळ नावाचे फलक लावले नाहीत, तर नाव बदललेल्या पाट्यांना काळे फासण्याचे आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा दिला.
Web Title: mumbai builder on shivsena radar