Mumbai Building Collapse : इमारत बेकायदा असल्याबाबत प्रशासनाकडून नोटीस नाही

Mumbai Building Collapse : इमारत बेकायदा असल्याबाबत प्रशासनाकडून नोटीस नाही

मुंबई : डोंगरी परिसरात चार मजली इमारत आज (मंगळवार) कोसळली. कौसरबाग ही इमारत कोसळली असून, ही निवासी इमारत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही इमारत धोकादायक असल्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही नोटीस दिली नसल्याचे समोर आले.  

ही दुर्घटना घडल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरातील काही इमारतींना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कोसळलेल्या इमारतीला प्रशासनाकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. ही इमारत जुनी असून, या इमारतींचे बांधकाम 1985-87 मध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. या इमारतीमध्ये काही गैरव्यवहार झाला आहे. या इमारतीत ज्या प्लॅटधारकांच्या नावे फ्लॅट आहेत. त्यातील लोक या इमारतीमध्ये राहत नाहीत. या फ्लॅटधारकांनी त्यांची घरे भाड्याने दिल्याचे समजत आहे. मुंबईतील हे मोठे प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहेा. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितले, की प्राथमिक माहितीनुसार सुमारे 15 कुटुंबीय डोंगरी येथील इमारत दुर्घटनेत दबले असण्याची शक्यता आहे. आम्ही संपूर्ण लक्ष आधी मदत कार्याकडे केंद्रित केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com