Mega Block : मुंबई : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ३ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
mumbai central railway mega block
mumbai central railway mega blockSakal
Summary

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ३ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ३ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्व -

  • कुठे- ठाणे ते कल्याण अप आणि डाउन पाचवी सहावी मार्गिकेवर

  • कधी- सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत

परिणाम -

  • या ब्लॉकदरम्यान ट्रेन क्रमांक १२१२६ पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाणार आहे. तसेच

  • सर्व अँप- डाउन मार्गावर मेल एक्सप्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आणि वेळेनुसार १०-१५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

  • वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता दिवा साठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी ११.४५ वाजता सुटेल.

mumbai central railway mega block
Shahrukh Khan : सुपरस्टार शाहरुख खानच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी; आरोपी ताब्यात

हार्बर रेल्वे

- कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर

- कधी - सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप-डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com