esakal | मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर ‘ऑक्सिजन पार्लर’

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर ‘ऑक्सिजन पार्लर’
मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर ‘ऑक्सिजन पार्लर’
sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : रेल्वे प्रशासनाच्यावतीने अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यात येतात. यामध्येच आता 'ऑक्सिजन पार्लर' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने नाशिक रोड स्थानकात 'ऑक्सिजन पार्लर' (oxygen-parlour) हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर मुंबई (mumbai) विभागाच्या काही स्थानकात 'ऑक्सिजन पार्लर' उभारण्याची योजना करण्यात आली आहे. यामध्ये 18 प्रकारच्या सर्वाधिक ऑक्सिजन देणारे रोपटे लावण्यात येणार आहेत. (mumbai central railway station oxygen parlour)

मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) हेरिटेज गल्लीमध्ये 'हर्बल गार्डनची निर्मिती केली आहे. यामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या आहेत. तर, आता मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने मुंबई विभागामधील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण या टर्मिनसचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात ऑक्सिजन पार्लर उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. पुढील 3 ते 4 महिन्यांच्या कालावधी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्सिजन पार्लर (oxygen parlour) उभारण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: 'ऑक्सिजन काँसंट्रेटर' ठरतेय संजीवनी, वाचा कसा अन् कधी करावा वापर?

मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकात हवा शुद्धीसाठी 2019 साली ऑक्सिजन पार्लर (रोप वाटिका) सुरु करण्यात आले आहे. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) कडून मान्यता प्राप्त 18 प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे रोपट्यांच्या समावेश आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण पूरक वातावरण प्रवाशांना मिळते. ऑक्सिजन पार्लरसाठी मध्य रेल्वे स्थानकांवरील जागेचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) मार्फत अनेक योजना राबवल्या जातात. यामधील नाशिक रोड स्थानकांवर ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात आले आहे. 250 चौ.फू. जागेमध्ये करण्याची योजना आहे. नासाच्या वतीने अंतराळात सोडण्यात येणाऱ्या यानातून तेथे गेल्यावर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर अंतराळवीरांना, ज्या झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, अशी झाडे या पार्लरमध्ये लावणार आहेत. ही झाडे घरातही ठेवणे शक्य आहे. यामध्ये वाॅरिगेडेट स्नेक प्लान्ट, विपिंग फिंग, स्पायडर प्लान्ट, चायनीज बांबू यासारखी 18 प्रकारची झाडे असणार आहेत. ऑक्सिजन पार्लरच्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला 72 हजार रुपयांचा महसूल मिळत आहे.

संपादन : शर्वरी जोशी