केंद्राने नकारले पण BMC ने तारले! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुदान

केंद्राने नकारले पण BMC ने तारले! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुदान

मुंबई  : कोरोना प्रतिबंधासाठी कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिकेच्या 93 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांचे अनुदान देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने या कर्मचाऱ्यांना वारसांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनामुळे महापालिकेच्या 197 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यातील 169 मृतांच्या कुटुबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळण्याचे प्रस्ताव पालिकेने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. मात्र, त्यातील 93 प्रस्ताव केंद्र सरकारने निकषात बसल्याचे सांगून नाकारले आहेत. तर आतापर्यंत 17 कर्मचाऱ्यांच्या वारसांना केंद्र सरकारने अनुदान दिले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. उर्वरीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता पालिकेकडून अनुदान देणार आहे. आतापर्यंत पालिकेने 54 कुटुंबांना 50 लाख रुपयांची मदत दिली आहे. केंद्र सरकारकडून जे प्रस्ताव नाकारले जातील, त्या सर्वांच्या वारसांना महापालिकेकडून अनुदान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

...म्हणून केंद्राचा नकार 
केंद्र सरकारच्या निकषानुसार, रुग्णालयात अथवा कोव्हिड केंद्रात काम करताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अनुदान दिले जाणार होते; मात्र प्रतिबंधीत क्षेत्रात काम करताना, स्थलांतरीत कामकारांना अन्नवाटप करताना किंवा प्रतिबंधीत क्षेत्रात सफाईचे काम करतानाही काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे प्रस्तावही पालिकेने पाठवले होते. परंतु हे प्रस्ताव निकषात बसत नसल्याचे सांगत केंद्राने मदत देण्यास नकार दिला आहे.

----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

mumbai city marathi news BMC Grants heirs employees who died by Corona latest update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com