मालमत्ता कर वसुलीसाठी दोन हेलिकॉप्टरचा लिलाव? BMCची प्रथमच चल संपत्तीवर टाच

मालमत्ता कर वसुलीसाठी दोन हेलिकॉप्टरचा लिलाव? BMCची प्रथमच चल संपत्तीवर टाच

मुंबई  : महानगर पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आजवर थकबाकीदारांच्या विविध वस्तूंचा लिलाव केला आहे. मात्र, पालिका प्रथमच जप्त केलेले दोन हेलिकॉप्टर लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधीत थकबाकीदार कंपनीची वीज खंडित करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे. 

मेस्को एअरोस्पेस या कंपनीचा 16 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकल्याप्रकरणी महानगर पालिकेने जुहू येथील विमानतळाशेजारील दोन हेलिकॉप्टर जप्त केली आहेत. पालिका प्रशासनाकडून आजवर जंगम मालमत्ताच जप्त केली जात होती. मात्र, गेल्या वर्षी थकबाकीदारांच्या चल संपत्तीवर पहिल्यांदाच टाच आणण्यात आली. यात सहा वाहने आणि दोन हेलिकॉप्टरचाही समावेश होता, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. मार्च 2020 मध्ये असलेल्या थकीत मालमत्ता करात या वर्षीच्या मालमत्ता करासह दंडाचीही भर पडली आहे. 

कायदेशीर बाबी पडतळणार 
चल संपत्तीचा लिलाव करण्यासाठी पालिकेने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठीच्या कायदेशीर बाबी तपासल्या जातील. याशिवाय थकबाकीदाराकडून ताब्यात घेण्यात आलेल्या हेलिकॉप्टर इतर कोणाचे कर्ज आहे का, हेही तपासले जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे कर निर्धारण संकलन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

mumbai city news Auction of two helicopters for recovery of property tax BMCs first mobile asset

--------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com