
गेल्या वर्षभरात इंधनाच्या दरासह सीएनजीच्या दरात सुद्धा 50 टक्के वाढ झाली आहे. यापुर्वी 49 रूपये प्रतिकिलो सीएऩजी दर 90 रूपयांपर्यंत पोहचले होते.
CNG Gas : सीएनजी दरातील कपात तुटपुंजी
मुंबई - गेल्या वर्षभरात इंधनाच्या दरासह सीएनजीच्या दरात सुद्धा 50 टक्के वाढ झाली आहे. यापुर्वी 49 रूपये प्रतिकिलो सीएऩजी दर 90 रूपयांपर्यंत पोहचले होते. त्यानंतर काही किरकोळ घट होऊन मंगळवारी 2.50 रूपयांची दरात कपात केली. मात्र, ही कपात तुटपुंजी असून, रिक्षा, टॅक्सी चालक मालकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सरकारने सीएनजी दरात सुमारे 40 टक्के सवलत देण्याची मागणी रिक्षा,टॅक्सी युनियनने केली आहे.
गेल्या वर्षांपासून सवलतीच्या दरात सीएनजी देण्याची मागणी युनियनच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने सवलतीच्या दरात सीएनजी देण्यासंदर्भात केंद्राला प्रस्ताव पाठवायला हवे, त्यामूळे सीएनजीच्या दरात कोणतीही चढउतार झाल्यास प्रवासी वाहतुकीतून कुटूंब चालवणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांच्या आयुष्यावर आर्थीक परिणाम होणार नाही. शिवाय भाडे वाढीची मागणी सुद्धा केली जाणार नसून, सर्वसामान्य प्रवाशांवर भाड्याचा बोजा सुद्धा पडणार नाही.
त्यामूळे सरकारने सीएनजीच्या दरात सध्या केलेली कपात सीएनजी वापरकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसणारी असून, 40 टक्के सवलतीच्या दरात सीएनजी देण्याची मागणी रिक्षा, टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे.