कोस्टल रोडवरील स्थगिती उठली, आता उत्तर मुंबई येणार दक्षिण मुंबईजवळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

बातमी मुंबईतील कोस्टल रोड संदर्भातील, बातमी शिवसेना आणि मुंबई महानगर पालिकेला दिलासा देणारी. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पावरची स्थगिती सुप्रीम कोर्टानं उठवलीय. हायकोर्टाच्या आदेशानंतर 19 जुलैपासून प्रकल्पाला स्थगिती होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं सांगत राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं.

बातमी मुंबईतील कोस्टल रोड संदर्भातील, बातमी शिवसेना आणि मुंबई महानगर पालिकेला दिलासा देणारी. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पावरची स्थगिती सुप्रीम कोर्टानं उठवलीय. हायकोर्टाच्या आदेशानंतर 19 जुलैपासून प्रकल्पाला स्थगिती होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं सांगत राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं.

सुप्रीम कोर्टानं कोस्टल रोडवरच्या कामाची स्थगिती उठवल्यामुळं राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला मोठा दिलासा मिळालाय. कोस्टल रोड संदर्भातील काम गेल्या जुलैपासून रखडलं आहे. कोस्टल रोडचं काम सुरु करण्याचे निर्देश आता न्यायालायनं दिले आहेत.

महत्त्वाची बातमी :  राहुल गांधी यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने उचललं 'हे' पाऊल

 

याच वर्षी जुलै महिन्यात मुंबई महापालिकेचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणाऱ्या या प्रस्तावित कोस्टल रोडसाठी समुद्रालगत मोठा भराव टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशी, सामाजिक कार्यकर्ते आणि मच्छीमारांचा विरोध आहे. यासंदर्भातील महत्त्वाच्या परवानग्या घेतल्या नसल्याचं उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलं होतं. कोस्टल रोड प्रकल्पासाठी महापालिकेनं मिळवलेली सीआरझेडची मंजुरी न्यायालयानं रद्दबातल ठरवली होती. 

आज सुप्रीम कोर्टाने कोस्टल रोड प्रकल्पावरील स्थगिती मागे घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच कोस्टल रोडच्या कामाला सुरूवात होईल. मुंबईकरांसाठी हा महत्तवाचा निर्णय आहे. 

- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री  

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल तब्बल 12 हजार कोटींचा आहे. दरम्यान आता सुप्रिम कोर्टाने उठवलेल्या स्थगितीमुळे मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कोस्टल रोडच्या कामाला गती आलेली पाहायला मिळेल.  

WebTitle : mumbai coastal road project gets green signal by supreme court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai coastal road project gets green signal by supreme court