Mumbai News : आकुर्ली, एक्सर ही मेट्रो स्थानकांचे कंट्रोल महिलांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Control of Akurli metro stations  Maharashtra's first women operated metro stations

Mumbai News : आकुर्ली, एक्सर ही मेट्रो स्थानकांचे कंट्रोल महिलांकडे

मुंबई : एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने मेट्रोमधील महिला कर्मचऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मुंबई मेट्रोसाठी महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. मेट्रो स्थानकांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन महिलां मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांपर्यंत ७६ महिला कर्मचाऱ्यांमार्फत मेट्रो मार्ग २अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या मेट्रो स्थानकांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन करण्याची सुरूवात झाली आहे. परिवहन क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित करून कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आकुर्ली आणि एक्सर या स्थानकांवरील सर्व-महिला कर्मचारी हे ३ शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत, ज्यामध्ये स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साइज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी इ. अधिकारी मेट्रो प्रवाशांना मदत करतील, तर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी मेट्रो स्थानकांवरील सुरक्षितता आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करतील.

हा उपक्रम केवळ परिवहन उद्योगातील महिलांच्या क्षमता अधोरेखित करणारा नसून इतर महिलांना या क्षेत्रात करीयर करण्यासाठी प्रेरीत करणारा ठरेल. मेट्रोच्या कार्यान्वयनासाठी सुमारे २७% म्हणजे ९५८ महिला कर्माऱ्यांचा समावेश असून ते देखभाल आणि दुरुस्ती, एचआर, वित्त आणि प्रशासन या विभागात कार्यरत आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी समान संधी मिळण्याची खात्री करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Mumbai NewsMumbaiMetro