मुंबई पोलिसाच्या कुटूंबाने नोंदवला विक्रम! अवघ्या काही तासात पार केले एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियाचे अंतर

मुंबई पोलिसाच्या कुटूंबाने नोंदवला विक्रम! अवघ्या काही तासात पार केले एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियाचे अंतर

मुंबई - मुंबई पोलिसांत हवालदार असलेले सुखदेव धुर्वे ( वय 46 ) यांनी आपल्या कुटूंबासह  एलिफंटा लेणी ते गेट वे ऑफ इंडिया हे समुद्रातील अंतर पार केले. त्यानिमित्त त्यांचा हा विक्रम एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांतील बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ट हवालदार म्हणून ओळख असलेले सुखदेव धुर्वे यांच्या कुटूंबाने रिले जलतरण प्रकारात एक वेगळा विक्रम स्थापित केला आहे. सुखदेव यांच्या पत्नी वैशाली, मुलगा सार्थक ( वय 17 ) आणि मुलगी तन्वी ( वय 9 ) यांनी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे 16 किमी अंतर 4 तास 31 मिनिटात पार केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याविषयी वृत्त प्रकाशित केले आहे.

सुखदेव यांनी 2009 मध्ये स्पेन जवळील जिब्राल्टर खाडी 4 तास 45 मिनिटात पार केली होती. त्यामुळे त्यांना जगातील सर्वात वेगवान अदिवासी जलतरणपटू हा किताब मिळाला होता. त्यांच्या  कुटूंबाने आता इंग्लिश खाडी आणि पाल्कची समुद्रध्वनी पार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. जलतरण क्षेत्रात आपल्या देशाचा झेंडा उंचावर घेऊन जाणार असल्याचे सुखदेव यांनी म्हटले आहे

mumbai cop family set record by swimming 16 km from elephanta to gateway of india

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com