मुंबईत बरे होण्याचा दर 82 टक्क्यांवर, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मात्र वाढताच

मुंबईत बरे होण्याचा दर 82 टक्क्यांवर, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मात्र वाढताच

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  मुंबईत मंगळवार 1,713 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,02,488 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे. मंगळवारी 49 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,880 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 2,319 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 82 टक्के इतका झाला  आहे.   

मुंबईत मंगळवारी नोंद झालेल्या 49 मृत्यूंपैकी 40 जणांना दीर्घकालीन आजार होते. कालच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 12 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 49 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 14 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते तर 33 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते.
            
मंगळवारी 2,319 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,67,202 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर वाढून 66 दिवसांवर गेला आहे. 28 सप्टेंबरपर्यंत एकूण 11,01,734  कोविड चाचण्या करण्यात आल्या.  22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.05  इतका आहे. 

मुंबईत 666 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.  सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या 10,235 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 13,455 अति जोखमीचे रुग्ण आहेत. तर 1,831 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

जी उत्तरमध्ये 65 नवीन रूग्णांची भर
 
जी उत्तरमध्ये मंगळवारी 65 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. धारावीमध्ये काल दिवसभरात 13 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3165 इतकी झाली आहे.  188 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादरमध्ये 27 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,558 इतकी झाली आहे. 502 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये मंगळवारी 25 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 3195 इतकी झाली आहे. तर 410 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात मंगळवारी 65 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 9,918 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 556 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

धारावीमध्ये 2,690, दादरमध्ये 2,935 तर माहीममध्ये 2,572 असे एकूण 8,297 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,100 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Corona 1,713 New patients tuesday growth rate 1.05 per cent

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com