मुंबईत आज दिवसभरात किती कोरोना रुग्ण वाढलेत ? वाचा आजचा मुंबईचा कोरोना रिपोर्ट काय

मुंबईत आज दिवसभरात किती कोरोना रुग्ण वाढलेत ? वाचा आजचा मुंबईचा कोरोना रिपोर्ट काय

मुंबई, ता. 1 : मुंबईत आज 855 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3 लाख 26 हजार 770 झाली आहे. आज 876 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3 लाख 04 हजार 736 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या 18 हजारावर गेली आहे.  तर कोविड रुग्णवाढीचा दर  0.28 इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 32 लाख 91 हजार 721 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत आज केवळ 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजर 474 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 244 दिवसांवर आला आहे.

मुंबईत आज मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांपैकी सर्व चौघे पुरुष होते. तर चार ही मृतकांचे वय 60 वर्षावर होते.

मुंबईत 10 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 137 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 5 हजार 863 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 431 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

mumbai corona count update new 855 patients detected from mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com