मुंबईत दिवसभरात २१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकाचा मृत्यू | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात २१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत आज केवळ एका कोविड मृत्यूची (corona deaths) नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,297 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. आज कोरोनाचे 218 नवे रुग्ण (corona new patients) आढळले.  कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,59,995 वर पोहोचली आहे. आज 188 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,38,343 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत. 

हेही वाचा: अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्राच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ

मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2031 दिवस झाला आहे.मुंबईत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 2804 आहे. मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 31,955 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,19,59,724 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

loading image
go to top