मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 176 नव्या रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 176 नव्या रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोना चाचण्यांची (corona test) संख्या कमी झाल्याने कोरोनाच्या नवीन रुग्णांची (corona new patients) संख्या ही कमी झाली असून आज 176 नवीन रुग्ण आढळले. ही दुसऱ्या लाटेनंतरची निच्चांकी नोंद झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,61,322 वर पोहोचली आहे. आज 295 रुग्णांनी कोरोनावर मात (corona free patients) केल्याने आतापर्यंत 7,40,002 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: ज्ञानदेव वानखेडे यांच्या 'या' मागणीला मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

मुंबईतील नवीन रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2453 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून  2484 दिवस झाला आहे.मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने पॉझिटिव्हिटी दर देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे. मुंबईत मृत्यूंची संख्या नियंत्रणात असून आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,310 वर पोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 24,798 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,21,65,445 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

loading image
go to top