esakal | क्लीनअप मार्शलकडून पुन्हा मुंबईकरांची लूटमार!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

क्लीनअप मार्शलकडून पुन्हा मुंबईकरांची लूटमार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विनामास्क नागरिकांच्या लुटमारीप्रकरणी मुंबई (Mumbai) महापालिकेने क्लिनअप मार्शलचे दंड वसुलीचा अधिकार रद्द करण्याची घोषणा केली होती. तसेच घाटकोपर येथील बोगस मार्शलविरोधात पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती; मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नसताना मंगळवारी त्याच मार्शलककडून घाटकोपर परिसरात गस्त घालत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

घाटकोपर पूर्वेला ३० सप्टेंबर रोजी दोन कथित मार्शल गणवेश न घालता विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करत होते. हा प्रकार लक्षात येताच पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पालिकेच्या प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी सदर मार्शल बोगस असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची विनंती केली. त्यानुसार छेडा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा: क्लीनअप मार्शल महिले मारहाण! बाईक स्वाराला अटक!

मंगळवारी पुन्हा हेच स्वयंघोषित मार्शल घाटकोपर परिसरात फिरत होते. त्यासाठी तक्रारीत नमूद केलेले वाहनही सोबत असल्याचा दावाही छेडा यांनी केला. महापालिकेने नियुक्त केलेल्या मार्शलला गणवेश परिधान करूनच दंड वसूल करणे बंधनकारक आहे; मात्र आजही अनेक ठिकाणी हा नियम पाळला जात नाही.

loading image
go to top