Mumbai : गाईंना गुंगीचे औषध देऊन तस्करी; कल्याणमध्ये गो तस्करी करणाऱ्या एकाला अटक

कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर खाडी परिसरात जीन्स कारखान्याजवळ गाईंना आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती.
गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करून चोरून नेणारी टोळी
गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करून चोरून नेणारी टोळीsakal

डोंबिवली - गाईंना गुंगीचे औषध देऊन स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत त्यांना भरुन त्यांची तस्करी करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे. कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारत सोयब निजाम करके (वय 32) याला अटक केली आहे. तर उर्वरित 5 ओरीपे हे पोलिसांना पाहताच पळून गेले आहेत.

यामध्ये पोलिसांनी दोन गायींची सुटका करत एक रिक्षा, दोन स्विफ्ट गाड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनानुसार गुन्हा दाखल करत या तस्करीत फरार झालेल्या 5 आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरिक्षक अरुण घोलप,

कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर खाडी परिसरात जीन्स कारखान्याजवळ गाईंना आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. कारखान्याजवळील मोकळ्या जागेत हा कत्तलखाना सुरु असल्याने बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अरुण घोलप, पोलीस हवालदार साळवी,

गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करून चोरून नेणारी टोळी
Mumbai : मध्य रेल्वेवर शनिवारी- रविवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक !

बागुल ,बाविस्कर, पावसे व पोलीस नाईक फड यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सागर इमारतीच्या शेजारी खाडीकिनारी छापा मारत सोयब करके याला रंगेहात पकडत दोन गायींची सुटका केली. या दरम्यान पोलिस आल्याचे समजताच घटनास्थळावरुन इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी, अरबाज, गोरू, मच्छिआवली, बारक्या असे इतर पाच आरोपी पळून घेले.

पोलिसांनी सांगितले, हे सर्व आरोपी ग्रामीण भागात रानामध्ये चारा खात असलेल्या गायी, बैलांना गुंगीचे इंजेक्शन द्यायचे. थोड्यावेळाने गुंगी येऊन ही जनावरे खाली पडल्यानंतर त्यांना एका चादरीत गुंडाळून पाच ते सहा जम मिळून त्यांना स्विफ्ट गाडीच्या डिक्कित भरुन त्यांची वाहतूक करायचे.

कायदेशीर परवानगी नसताना गोवंश जातीच्या जनावरास क्रूरपणे धारधार हत्यारांनी ठार मारणे. त्यांचे अवयव विक्री करायचे याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम या अधिनियमानुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

तसेच घटनास्थळावरुन एक रिक्षा, दोन स्विफ्ट गाड्या, लोखंडी सुरा, हूक, सुतळ यांसारख्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com