Mumbai Crime : मोलकरीण बनून घरफोड्या करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Mumbai Crime : मोलकरीण बनून घरफोड्या करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

मुंबई : मुंबईतील बीकेसी पोलिसांनी गुरूवारी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला गजाआड केले आहे. या तीन महिलांकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि लाखांची रोकड जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एका घरात छापा मारत आरोपींनी लपवून ठेवलेले 35 लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ जप्त केले.

अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला मुंबई उपनगरातील वांद्रे परिसरात एका इमारतीत मोलकरीण म्हणून कार्यरत होती. ज्या घरात महिला कामावर होती तिथे मालक घराबाहेर काही काळ राहणार असल्याचे तिला समजले. त्यानुसार मोलकरणीने आपल्या इतर 2 महिला साथिदारांसोबत योजना तयार केली. या टोळीने 14 एप्रिल ते 6 मे दरम्यान मालक घराबाहेर असताना घरात चोरी केली होती.

घर मालकाला समजताच या संदर्भात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू केला. सर्व प्रथम मोलकरणीची चौकशी करण्यात आली आणि सायन परिसरातून मोलकरणीला अटक करण्यात आली. पुढील तापासात आरोपी मोलकरणीने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर तिच्या 2 साथीदार महिलाना पकडण्यात आले.