
Mumbai Crime : धावत्या लोकलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला रंगेहात अटक
मुंबई : धावत्या लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या खिशातील मोबाइल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरांना पोलिसांनी रंगेहात पकडण्यात आले आहे. मोहम्मद रईस रफीक शेख असे मोबाईल चोरट्यांचे नाव असून त्याच्यावर वेगवेगळ्या रेल्वे पोलीस ठाण्यात १२ हून अधिक मोबाइल चोरी आणि मौल्यवान ऐवज चोरी करण्याचे गुन्हे दाखल आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ आणि ६ वर रेल्वे पोलिसांचे महिला सुरक्ष पथक गस्त करीत असताना आरोपी फलाट क्रमांक ६ वर आलेल्या सीएसएमटी लोकलच्या सामान्य डब्यात चढणाऱ्या एका रेल्वे प्रवाशाच्या खिशातून मोबाइल काढून चोरून लोकलच्या दुसऱ्या दरवाज्यातून आत चढताना, महिला सुरक्षा पथकाने आरोपीला रंगेहात पकडले.
त्यानंतर आरोपीला कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात आली. त्याने त्याचे नाव मोहम्मद रईस रफीक शेख उर्फ नाजीम शेख (३०) असे सांगितले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीचा पूर्व इतिहास पडताळून पाहिला असता, अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात ५, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात ४ आणि वसई, वांद्रे व कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्ह्यांची नोंद आहे.