Mumbai Crime News : शेअर ट्रेडिंग कंपनीला गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime branch action accused arrested share trading fraud company

Mumbai Crime News : शेअर ट्रेडिंग कंपनीला गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

मुंबई : मुंबईत एका शेअर ट्रेडिंग फर्ममध्ये कार्यरत 31 वर्षीय अकाउंटंटला ग्राहकाच्या खात्यातून 2.73 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात कलम 420 (फसवणूक) आणि भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाचा तपास सुरू झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने 4 मार्च शनिवारी कांदिवलीतून आरोपीला अटक केली. तक्रारीनुसार, तक्रारदार व्यक्तीने शेअर-ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून डीमॅट खाते उघडले होते. खाते उघडताना आरोपीने तक्रारदाराला मदत केली होती.

पिडीत व्यक्तीने आरोपीशी 2019 ते 2021 या कालावधीत शेअर ट्रेडिंग खात्यातून कोणताही व्यवहार केला नाही.परंतु तक्रारदाराच्या खात्यातून सुमारे 2.73 कोटी रुपये वजा झाले. त्यानंतर या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.फरार असलेल्या आरोपीला एका गुप्त माहितीच्या आधारे पकडण्यात आले, तर या गुन्ह्यात सहभागी असलेला आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.