Mumbai Crime : एसबीआय बँक फसवणूक प्रकरणी बिल्डर हरेश मेहतांना CBIकडून अटक | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime news

Mumbai Crime : एसबीआय बँक फसवणूक प्रकरणी बिल्डर हरेश मेहतांना CBIकडून अटक

मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने सोमवारी दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रोहन लाईफस्पेसेस लिमिटेड कंपनीचे संचालक हरेश मेहता यांना फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. या प्रकरणात 280 कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून एसबीआय सारख्या बँकेची फसवणूक करण्यात आली आहे.

सीबीआयच्या मुंबई युनिटकडे साल 2016 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ठाणे शाखेने राजपूत रिटेल लिमिटेड कंपनीच्या विजय गुप्ता आणि अजय गुप्ता या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने तपास सुरू केला. आरोपी संचालकांनी अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यासोबत कट रचला.

तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करून बँकेकडून तीन कर्ज घेतले. नंतर या बँकांची 280 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.तपासादरम्यान, रोहन लाईफस्पेसेस लिमिटेड कंपनीचे संचालक हरेश मेहता यांची भूमिका समोर आली. सीबीआयने मेहता यांच्या कंपनीची कार्यालये आणि निवासस्थानांची झडती घेतली.

द रुबी नावाच्या इमारतीतील मालमत्तांच्या खरेदीसाठी एकूण 155 कोटी रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगून मेहता बनावट कागदपत्रे बनवणे किंवा फसवणूक करणे यात गुंतलेले नसल्याचा दावा मेहतांच्या वकिलानी केला आहे.

टॅग्स :Mumbai NewsCrime News