esakal | अल्पवयीन मुलीच्या सहमतीने शारीरिक संबंध! पण कायद्याची संमती आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीच्या सहमतीने शारीरिक संबंध! पण कायद्याची संमती आहे का?

अल्पवयीन मुलीच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असले तरी कायदेशीर तरतुदीमध्ये याबाबत अस्पष्टता आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे

अल्पवयीन मुलीच्या सहमतीने शारीरिक संबंध! पण कायद्याची संमती आहे का?

sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई  : अल्पवयीन मुलीच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असले तरी कायदेशीर तरतुदीमध्ये याबाबत अस्पष्टता आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. तसेच या प्रकरणातील एकोणीस वर्षीय आरोपीची दहा वर्षाची शिक्षादेखील स्थगित केली आहे. 

पिडीत अल्पवयीन मुलगी तिच्या काकांकडे राहत होती. तिच्या चुलत भावाने तिचे लैंगिक शोषण केले असा आरोप तिने प्रारंभी केला होता. याबद्दल तीने तिच्या मैत्रिणीला सांगितले. मैत्रिणीने ही घटना शाळेच्या शिक्षिकांना सांगितले. यानंतर घरी याची माहिती मिळाली आणि पोलीस फिर्याद करण्यात आली. सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षे शिक्षा सुनावली. मागील सुमारे चार वर्ष तो कारागृहात होता. आता त्याने शिक्षेविरोधात अपील दाखल केले. न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. संबंधित मुलीच्या सहमतीने सर्व काही घडले असा दावा त्याने केला. मुलीने खटल्यात देखील हेच सांगितले होते. तसेच शिक्षकांच्या दबावातून तीने शारीरिक शोषण झाले असे सांगितले, असाही दावा केला. अपीलाची सुनावणी होईपर्यंत जामीन मंजूर करावा अशी मागणी त्याने केली आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अल्पवयीन मुलीची सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असले तरी तो कायद्याच्या कक्षेत ती समंती होऊ शकत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. त्यामुळे याबाबत कायद्याच्या कक्षेत अस्पष्टता आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. न्यायालयाने आरोपीची शिक्षा निलंबित केली असून त्याला तूर्तास जामीन मंजूर केला. 

पिडित मुलीने तिचा जबानी फिरवली आहे. तसेच ते दोघेही विद्यार्थी आहेत आणि एकाच ठिकाणी राहतात. यामध्ये न्यायवैद्यक शास्राचा अहवाल महत्त्वाचा आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि जमीन मंजूर केला.

--------------------------------------------

mumbai crime coitus with the consent of the minor girl marathi latest update