पोर्न चित्रफीतनिर्मितीप्रकरणी अभिनेत्रीच्या पतीला अटक; आतापर्यंत आठ जणांवर कारवाई

अनिश पाटील
Tuesday, 9 February 2021

पोर्न व्हिडीओ संकेतस्थळावर अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री यास्मीन बेग-खान हिचा पती दीपांकर पारितोष खासनवीस याला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली.

मुंबई - वेब सीरिजसाठी निर्मिती संस्था तयार करून पोर्न व्हिडीओ संकेतस्थळावर अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री यास्मीन बेग-खान हिचा पती दीपांकर पारितोष खासनवीस याला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली. यापूर्वी याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली होती. 

वेब सीरिजच्या नावाखाली पोर्न चित्रफिती बनवून संकेतस्थळावर अपलोड केले जात होते. स्वतः निर्मिती संस्था तयार करून पोर्न व्हिडीओ संकेतस्थळावर अपलोड केले जात असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला. या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव उघडकीस आले होते. गहनाची स्वतःची निर्मिती संस्था असल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गहना वेब सीरिज, लघुपटाच्या नावाखाली पोर्न व्हिडीओ तयार करायची आणि ते संकेतस्थळावर अपलोड करायची, असा आरोप तिच्यावर आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी गहनाला अटक केली होती. आता याप्रकरणी अमेरिकन ऍप्लिकेशन कंपनीचा प्रतिनिधी उमेश कामत याचेही नाव उघड झाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती.

मुंबई, ठाणे, रायगड. पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आता याप्रकरणी दीपांकरचाही सहभाग आढळल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. कारवाईत पोर्न संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपद्वारे अश्‍लील चित्रफितींचा व्यवसाय करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये अभिनेत्रीसह दोन अभिनेता, एक ग्राफिक डिझायनर महिला, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांना समावेश आहे. 

मालवणीतही तक्रार 
पोर्न व्हिडीओप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात आणखी एक तक्रार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या टोळक्‍याचा त्यात सहभाग असून, आणखी पीडितही येणाऱ्या काळात पुढे येण्याची शक्‍यता आहे. 

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai crime marathi news Actresss husband arrested for making abuse videos latest update


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai crime marathi news Actresss husband arrested for making abuse videos latest update