फेसबुकवरून ओळख झालेल्या मित्राने केला विवाहितेवर अत्याचार

फेसबुकवरून ओळख झालेल्या मित्राने केला विवाहितेवर अत्याचार

मुंबई :  फेसबुक या सोशल मिडियावर ओळख झालेल्या विवाहित महिलेच्या ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार करणा-याला गुन्हे शाखेच्या  पोलिसांनी अटक केली आहे. गणेश चंद्रभान गिते (28) असे अटक आरोपीचे नाव असून तो गोरेगाव येथेराहणारा आहे.

या प्रकरणात गिते गेल्या आॅक्टोबरपासून फरारी होता. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील 27 वर्षीय विवाहित महिलेला आरोपी गितेने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. ती यातील बळिताने स्वीकार केल्यानंतर दोघांनी काही दिवस चॅटिंग केली. त्यानंतर ते एकदा भेटले. दुस-या वेळी आरोपीने बळिताला पवई येथे भेटण्यासाठी बोलावले. ते एका रेस्टॉरण्टमध्ये गेले असताना आरोपीने त्या महिलेला डिंक्स मधून गुंगीचे औषध पाजलेव तिला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा तपास घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गिते याला अटक करण्यात गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले.

--------------------------------------
mumbai crime marathi news A friend of Facebook abused married woman live updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com