
मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना फसवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अंधेरी पोलिसांनी अटक केली.
मुंबई - मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना फसवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अंधेरी पोलिसांनी अटक केली. आशीष पटेल (व 35), मोहम्मद इस्माइल इम्रान शेख (29), विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया (22) अशी या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलले होते. याप्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणारी 14 वर्षीय तरुणी पालघर परिसरात राहते. मॉडेलिंग क्षेत्रात काम करणारी तरुणी एक वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत प्रयत्न करत होती. अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये या तरुणीने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याच कामादरम्यान तिची ओळख आरोपी कास्टिंग डायरेक्टर विनोदकुमार अजनेरिया याच्याशी झाली होती. त्यानंतर विनोदकुमारने तिची ओळख दुसरा कास्टिंग डायरेक्टर आशीष पटेल याच्याशी करून दिली. त्या वेळी त्याने मुलीला तिच्या घरातून मालिकांमध्ये चांगले काम देण्याचे आमीष दाखवून मुंबईला बोलावले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मुलीला परपुरुषाशी संबंध ठेवण्यावर जबरदस्ती केली. ऐवढेच काय तर तिला त्यातून चांगले पैसे मिळतील, असे सांगत तिची विक्री केली.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांच्या मदतीने एका हॉटेल येथे तपासणी केली. त्या ठिकाणाहून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार अंधेरी पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
mumbai crime news Andheri police have arrested an event manager along with two casting directors
--------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )