Mumbai Crime News: भांडणात बापाचा संयम सुटला अन् मुलीवर पेट्रोल शिंपडून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Mumbai Crime News: भांडणात बापाचा संयम सुटला अन् मुलीवर पेट्रोल शिंपडून...

मुंबईतील धारावीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्याने आपल्या दत्तक मुलीवर पेट्रोल शिंपडून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मोहिनी रामजीत ही 20 वर्षीय तरुणी 70 टक्के भाजली आहे. (Latest Marathi News)

धारावी परिसरातील सायन हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र गेल्या शनिवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. धारावी पोलिसांनी आरोपी वडिलांना आयपीसीच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत आधीच अटक केली होती, पण आता त्यामध्ये हत्येचे कलमही जोडले आहे.(Latest Marathi News)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात धारावी परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या २० वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलं. यामध्ये मोहिनी 70 टक्के भाजली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायन हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या मोहिनीचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना बुधवारी पोलिसांनी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत अटक केली होती.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी घराबाहेर बसली असताना मंगळवारी ही घटना घडली. वडील आणि मुलीमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. भांडण इतकं वाढलं की वडील नंदकिशोर पटेल यांनी मोहिनीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. या आगीत मोहिनी ७० टक्के भाजली होती. आई काजल जैस्वार (50) आणि कुटुंबीयांनी तिला गंभीर अवस्थेत सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.(Latest Marathi News)

पोलिसांच्या माहीतीनुसार, दत्तक मुलगी मोहिनी ही काजल आणि पटेल यांच्यासोबत धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये राहत होती. पटेल देखील काजलची दत्तक मुलगी मोहिनीला स्वतःची मुलगी मानत होते, परंतु गेल्या काही महिन्यांत त्यांच्यातील संबंध बिघडले.

काजल आणि मोहिनी आपल्याकडे लक्ष देत नसल्याचं पटेल यांना वाटत होतं. तो त्यांची पूर्ण काळजी घेत होता. यामुळे संतापलेल्या त्याने त्याला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केले. अनेक दिवस रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत असलेल्या मोहिनीचा शनिवारी मृत्यू झाला. पोलिसांनी आता हे प्रकरण खुनाचा प्रयत्न तसेच खुनाच्या कलमात समाविष्ट करून पुढील कारवाई सुरू केली आहे.(Latest Marathi News)