Munbai Crime : खाण्याचं आमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 42 वर्षीय नारधमाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Munbai Crime : खाण्याचं आमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 42 वर्षीय नारधमाला अटक

मुंबईतून हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने तीन मुलींना नूडल्सचं आमीष दाखवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 42 वर्षीय नराधमाला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

आरोपीने शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनां आमिष दाखवत अत्याचार केला आहे. पीडित मुलींच्या आईने पोलिसांना माहितीनुसार आरोपी त्यांच्या शेजारी आहे. त्याने तीन मुलींना खाण्यापिण्याचे आमिष दाखवत आपल्या घरी बोलवलं. तिन्ही मुली आरोपीच्या घरात जाताच त्याने दरवाजा बंद केला, जेणेकरून कोणतीही मुलगी घरातून बाहेर पळून जाऊ नये. त्यानंतर त्याने तिन्ही मुलींवर अत्याचार केला.

घटनेनंतर जेव्हा मुली आरोपीच्या घरातून आपल्या घरी परतल्या तेव्हा त्यांनी आईला सर्व माहिती दिली. मुलींनी हे सांगताच आईने पोलिस स्थानकात जाऊन याबाबतची माहिती दिली. मुलींनी सांगितलेली घटना ऐकल्यावर आईने जे.जे. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

टॅग्स :Mumbai Newscrime