वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यालाच सायबर गुन्हेगारांचा फटका; पत्रकाराने फोन केल्यावर समजलं प्रकरण

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यालाच सायबर गुन्हेगारांचा फटका; पत्रकाराने फोन केल्यावर समजलं प्रकरण

मुंबई, ता.13 : राज्यातील आणखी एक वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आरोपीने फ्रेन्ड लिस्टमधील मित्रांची ऑनलाईन फसणूक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विनयकुमार चौबे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

चौबे यांच्या फ्रेन्ड लिस्टमधील मित्र, नातेवाईक, पत्रकार आदी व्यक्तींना या बनावट फेसबुक खात्याच्या माध्यमातून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आली आहे. आरोपीने चौबे यांच्या फेसबुक खात्यावर असलेल्या फोटोचाच वापर करून बनावट खाते तयार केले आहे. ज्या व्यक्तींनी या बनावट खात्यावरून आलेली फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली आहे. त्यांना पैशांची मागणी करणारे संदेश पाठवले आहेत.

एका पत्रकाराला अशा प्रकारे संदेश पाठवून 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण या पत्रकाराला संशय आल्यामुळे त्याने तात्काळ अधिकाऱ्याला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अनेकांनी याबाबतची माहिती चौबे यांना दिली. अखेर चौबे यांनी तात्काळ ट्वीट करून हे खाते आपले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ख-या फेसबुक खात्यावरूनही संदेश पोस्ट केला आहे.

चौबे यांच्या कानपूर येथील अधिकारी मित्राला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याने तात्काळ सायबर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी हे खाते बंद केले असून तपासाला सुरूवात केली आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातही आयकर अधिकाऱ्याच्या नावानेही अशाच प्रकारे दोन बनावट फेसबुक खाती तयार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार व केरळ येथील आयपीएस, आयएएस, आयआरएस अधिका-यांच्या नावानेही अशा प्रकारे बनावट फेसबुक खाते तयार केल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबईतही दोन आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्याच्या बनावट फेसबुक खात्यांप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. 

mumbai crime news senior police officers facbook account hacked by cyber criminals

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com