
Lalbaug Murder Case : "आम्ही तिला सांगत होतो की काकूंचा श्वास बंद झालाय, पण तिने आम्हाला हाकललं"
मुंबईतल्या लालबाग इथं एका मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याची घटना घडली आहे. या मुलीला आता ताब्यात घेतलं असून तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. काही जणांनी तिला सांगितलं होतं की, तुझ्या आईचा श्वास सुरू आहे, पण तिने त्यांना हाकलून दिल्याचं समोर येत आहे.
रिंपलच्या संपर्कात असलेल्या सहा जणांचे जबाब नोंदवणाऱ्या काळाचौकी पोलिसांनी वीणा जैन मृत्यूप्रकरणी हा धक्कादायक तपशील उघड केला आहे. एका चायनीज हॉटेलमध्ये काम करणारा एक कर्मचारी जैन यांच्या शेजारी राहत होता.
त्याने सांगितलं की, २७ डिसेंबरच्या पहाटे आम्ही सगळे झोपलो होतो. तेव्हा बाहेर गेलेल्या आमच्या एका सहकाऱ्याने आम्हाला सांगितलं की काकू खाली पडल्या आहेत. तेव्हा आम्ही त्यांना मदत करायला गेलो आणि त्यांना घरी पोहोचवलं. आम्हाला त्यांच्या हातावर जखमही झालेली दिसली.
तो कर्मचारी पुढे म्हणाला, "आम्ही जेव्हा त्यांना घरी घेऊन गेलो, तेव्हा काकूंचा श्वास चालत नव्हता. आम्ही ही गोष्टी रिंपलला सांगितली आणि हॉस्पिटलमध्ये न्यायचं का असंही विचारलं. शिवाय नातेवाईकांना बोलावून घ्यायचाही सल्ला दिला. पण तिने नकार दिला आणि आम्हाला हाकललं. मी सांभाळून घेईन, असंही ती आम्हाला म्हणाली."
रिंपलने चौकशीत काय सांगितलं?
"पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचं मला कळलं आणि मी घाबरले. पण नातेवाईक मलाच दोष देतील, असं वाटलं. म्हणून मी घाईघाईने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला."
जैन यांचा मृत्यू अपघाती होता की रिंपलने ढकलून दिलं, याबद्दल पोलीस आता तपास करत आहेत.