Mumbai Crime : स्वछतागृहाच्या तारा उचकटून त्याने तेथून पळ काढला,कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करत केली अटक Mumbai Crime police investigation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai crime news

Mumbai Crime : स्वछतागृहाच्या तारा उचकटून त्याने तेथून पळ काढला,कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करत केली अटक

Mumbai Crime - कल्याण लोहमार्ग पोलीसांनी एका गुन्ह्यात युराज सरतापे (वय 28) याला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असताना त्याने लघुशंका आली असल्याचे पोलिसांना सांगितले. लघुशंका करण्यासाठी त्याला बाहेरील स्वछतागृहात नेले असता पाठीमागील तारा उचकटून त्याने तेथून पळ काढला. बराच वेळ आरोपी बाहेर येत नसल्याने पोलिसांनी पाहिले असता तो पळाल्याचे समजले. पोलिसांनी उल्हासनगर पर्यंत पाठलाग करत युवराज याला अटक केली.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हवालदार प्रीतम मोहिते यांच्या तक्रारीवरून युवराज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत असून शुक्रवारी दुपारी त्याला चौकशी साठी गस्तीवरील पोलिसांनी बाहेर काढले होते. त्याला लघुशंका आल्याने पोलीस ठाण्याबाहेरील स्वच्छतागृहात नेण्यात आले. स्वच्छतागृहाच्या बाहेर दोन पोलीस उभे होते. बराच वेळ झाल्यानंतरही आरोपी बाहेर येत नाही म्हणून पोलीस हवालदार जाधव, पठाण यांनी दरवाजावर टकटक केली. आरोपी आत नव्हता. त्याचवेळी स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूची जाळी काढून, संरक्षित भिंतीवरील तार काढून युवराजने भिंतीवरून उडी मारून पळ काढला होता. याची चाहूल लागताच पोलिसांनी त्याचा पाठलाग उल्हासनगरमधील त्याच्या घरापर्यंत केला. रस्ते, गल्लीबोळातून पळून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. लालचक्की भागातील त्याच्या घराच्या परिसरातून युवराजला अटक करण्यात आली.

टॅग्स :Mumbai Newspolicecrime