मुंबईत प्राध्यापकाची क्रूरता; विवस्त्र करून विद्यार्थ्यांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

विद्याविहारच्या केजे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथील एका प्राध्यापकाने 13 ते 14 विद्यार्थ्यांना विवस्त्र करून मारहाण करण्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Crime : मुंबईत प्राध्यापकाची क्रूरता; विवस्त्र करून विद्यार्थ्यांना मारहाण

मुंबई - विद्याविहारच्या केजे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथील एका प्राध्यापकाने 13 ते 14 विद्यार्थ्यांना विवस्त्र करून मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. डहाणू येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थी असताना 13 ते 14 विद्यार्थ्यांना आरोपी प्राध्यापकाने विवस्त्र करून बुटानी मारहाण केली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना घयाची माहिती आहे. आरोपी प्राध्यापकामुळे विद्यार्थ्यांना थंडीत अर्धवट कपडे घालून दोन तास उभे राहावे लागले होते. मुख्याध्यापकांकडे तक्रार करूनही अद्याप प्राध्यापकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी 29 डिसेंबरला विद्यार्थी डहाणू येथे आले. प्राध्यापकाने सर्व विद्यार्थ्यांना रात्री 11:30 च्या सुमारास झोपायला सांगितले आणि तेथून निघून गेले. काही विद्यार्थ्यांना झोप येत नसल्याने विद्यार्थी कमी आवाजात गप्पा मारू लागले. थोड्या वेळाने आरोपी प्राध्यापक आला आणि जोरात दरवाजा ठोठावू लागला. एकदा एका विद्यार्थ्याने दरवाजा उघडला, आणि प्राध्यापकाने मुलांना मारहाण करायला सुरुवात केली.

युवक काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विद्यार्थिनींना त्यांचे अंतर्वस्त्र वगळता सर्व कपडे काढण्यास भाग पाडले आणि त्यांनी नकार दिल्यावर प्राध्यापकाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर भीतीने विद्यार्थ्यांनी त्यांची वस्त्रे उतरवले, त्यानंतर प्राध्यापकांनी त्यांना सर्व बाहेर मोकळ्या जागेत नेले आणि प्राध्यापकांसमोर दोन तास उभे केले. के. जे. सोमय्या कॉलेजने अद्याप आरोपी प्राध्यापकांवर कारवाई केलेली नाही.