प्रभाकर साईलच्या स्टेटमेंटनंतर तपासाला वेग - ज्ञानेश्वर सिंह | Aryan khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prabhakar Sail

प्रभाकर साईलच्या स्टेटमेंटनंतर तपासाला वेग - ज्ञानेश्वर सिंह

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी (cruise drug party) प्रकरणाच्या तपासात एनसीबी (NCB) दिल्लीच्या टिमला दुसऱ्या मुंबई भेटीत चांगलीच प्रगती करता आलीय. प्रकरणाचा पंच प्रभाकर साईलनं (Prabhakar sail) पुढे येऊन बऱ्याच गोष्टी सांगितल्यानं प्रकरणाच्या तपासावा वेग आल्साची माहीती एनसीबीचे डेप्युटी डीजी ज्ञानेश्वर सिंह (dnyaneshwar singh) यांनी दिलीय. आत्तापर्यंत प्रकरणात 15 जणांचे जबाब नोंदवण्यात (statement) आलेत. तर आणखी 5-6 जणांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: मॉरिशियन बांधकाम रँकिंगमध्ये लार्सन अँड टुब्रो आघाडीवर

या प्रकरणात एनसीबीला अनेक डिजीटल तसंच कागदोपत्री पुरावे मिळालेत. प्रत्येक पुरावा निट तपासुन पाहीला जातोय तसंच प्रत्येक साक्षीदाराचीही कसुन चौकशी केली जात असल्याचंही त्यांनी पुढे सांगितलं.

प्रत्येक महत्वाच्या साक्षीदारापर्यंत पोहोचणार

प्रकरणात अजुनही अनेक महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवणं बाकी असल्यानं सर्व महत्वाच्या साक्षीदारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असं ज्ञानेश्वर सिंह यांंनी सांगितलं. तसंच जोपर्यंत संपुर्ण माहीती मिळत नाही तोपर्यंत साक्षीदारांना चौकशीसाठी बोलवत राहणार आहोत, अशीही माहीती त्यांनी दिली.

किरण गोसावीच्या चौकशीसाठी अर्ज

किरण गोसावी हा क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणातला एनसीबीचा मुख्य साक्षीदार आहे. पण तो सध्या फसवणूकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असल्यानं त्याची चौकशी करता यावी यासाठी न्यायालयात अर्ज केलाय. सोमवारी त्याची पोलीस कोठडी संपणार असल्यानं त्याला कोर्टानं न्यायालयीन कोठडीत पाठवलं तर आम्हाला चौकशीची परवानगी द्यावी अशी मागणी त्या अर्जात करण्यात आलीय.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED कोठडीत तीन दिवसांची वाढ

विजय पगारेचा जबाब नोंदवला

आर्यन खान प्रकरणातला साक्षीदार म्हणून पुढे आलेला विजय पगारे यांनंही आर्यन खानला यात अडकवलं जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर एनसीबीनं नुकताच विजय पगारेचाही जबाब नोंदवलाय.

गेल्या वर्षभरातल्या केसेसे तपासणार

आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीच्या कमावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समिर वानखेडे यांच्यावरही नियमबाह्या कामं केल्याचे आरोप केले गेले, त्याच अनुशंगान गेल्या वर्षभरातील सर्व केसेसचं काम पडताळून पाहीलं जाणार असल्याचं ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.

मुंबई पोलिसांचं सहकार्य

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चांगलं सहकार्य केल्याचं ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. या प्रकरणासाठी आपण मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तपासात सहकार्य करण्याची हमी दिली, त्यानुसार आम्हाला हवं असलेलं सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी दिलं, अजून काही गोष्टींची मागणी आम्ही त्यांचेयाकडे केली असल्याचंही त्साॉनी सांगितलं.

loading image
go to top