esakal | मुंबई : घातक शस्त्रसाठा प्रकरणी अंधेरीत एकाला अटक | Mumbai crime update
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

मुंबई : घातक शस्त्रसाठा प्रकरणी अंधेरीत एकाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : घातक शस्त्रे (Weapons) घेऊन आलेल्या अशोक दत्तात्रय कसोले (वय ३८) याला अंधेरी येथून गुन्हे शाखेच्या (crime branch) अधिकाऱ्यांनी अटक (culprit arrested) केली. त्याच्याकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीची पिस्तूल (pistol), दहा जिवंत काडतुसे (bullet), एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर (rivolver) आणि एक मोबाईल (mobile) असा मुद्देमाल जप्त (seized) केला. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा (police FIR) नोंदविण्यात आला. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: राज्यभरात अॅक्युपंक्चरसाठी पात्रता परीक्षा सुरळीत

अंधेरीतील गोविंदवाडी, सुरेन रोडच्या गुरू नानक पेट्रोल पंपाजवळ घातक शस्त्रांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कसोले याला पकडले. त्याच्याकडे एक बॅग होती. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना चार देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, दहा जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल सापडला. अशोक हा मूळचा अहमदनगरच्या पाथर्डीचा रहिवासी असून, सध्या तो नवी मुंबईतील नवीन पनवेलच्या आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहतो.

loading image
go to top