बायकोचे अनैतिक संबंधाचा संशय; आरोपी पतीकडून शेजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी पतीने आपल्या शेजारच्याच्या हत्येचा प्रयत्न करण्याची घटना चुनाभट्टी परिसरात घडली आहे.

Mumbai Crime : बायकोचे अनैतिक संबंधाचा संशय; आरोपी पतीकडून शेजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न

मुंबई - बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी पतीने आपल्या शेजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करण्याची घटना चुनाभट्टी परिसरात घडली आहे. या प्रकरणात पिडीत गंभीर जखमी झाला असून हल्ला करून आरोपी पती रमेश मैत्री घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकरणी फिर्यादी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुनाभट्टी पोलीस या प्रकरणात रमेश मैत्री आणि या आरोपीं पतीचा शोध घेत आहे.

आरोपी आणि त्यांची पत्नी मुंबईतील चुनाभट्टी परिसरात वास्तव्यास आहेत. 18 मार्च रोजी रात्री साडे बारा वाजता आरोपीची पत्नी आणि आरोपीमध्ये वाद झाला. झालेल्या वादातून आरोपीने पत्नीला मारहाण केली. मारहाणीपासून बचावासाठी तिने शेजारी रामकुमार यांना बोलावले. शेजारी रामकुमार येताच आरोप पतीचा त्यांच्याशी वाद झाला.

रामकुमार आणि आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी पतीच्या मनात पूर्वीपासून होता. त्या संशयामुळे आग अनावर होत आरोपीने शेजारी रामकुमार यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ला करून आरोपी रमेश मैत्री घटनास्थळावरून पळूने गेला. या हल्ल्यात रामकुमार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आरोपी पतीचा शोध चुनाभट्टी पोलीस करत आहे.