डबेवाल्यांना चिमटा काढून राज ठाकरे म्हणालेत, मी सरकारशी बोलतो...

सुमित बागुल
Thursday, 24 September 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीस आज मुंबईतील डबेवाल्यांनी हजेरी लावली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीस आज मुंबईतील डबेवाल्यांनी हजेरी लावली. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबईतील डबेवाल्यांची सेवा बंद आहे. अनलॉकमध्ये मुंबईकरांची भूक भागविणाऱ्या डबेवाल्यांची सेवा सुरु झालीये. मात्र ट्रेनमधून प्रवास करता येत नसल्याने डबेवाल्यांचे चांगलेच हाल होतायत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सविनय कायदेभंग करत ट्रेनमधून प्रवास केलेला. मनसेच्या या भूमिकेला डबेवाल्यांनी पाठिंबा दिलाय. आज राज ठाकरेंची भेट घेऊन डबेवाल्यांनी राज ठाकरे यांना आपली गाऱ्हाणं सांगितलीत आणि आपल्या मागण्याचे निवेदन दिले. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट पार पडली. 

काय आहेत डबेवाल्यांच्या मागण्या: 

  • गेल्या सहा महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे डबेवाल्यांना डबे पोहोचवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. 
  • अनलॉक सुरु झाल्यामुळे आता ऑफिसेस सुरु झाली आहेत. कॉर्पोरेट ऑफिसेस सोबतच सरकारी ऑफिसेस देखील सुरु झाली आहेत. 
  • जिथे जमेल तिथे सायकलवर मुंबईतील डबेवाले सेवा पुरवतायत
  • डब्बेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या किंवा त्यांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असा दर्जा द्या आणि रेल्वेने प्रवास करू द्या

महत्वाची बातमी कोरोना संसर्गातून ब-या झालेल्या रुग्णांना जाणवतात पचन विकाराच्या समस्या 

महत्वाची बातमी : शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

राज ठाकरे काय म्हणालेत ? 

डबेवाल्यांना राज ठाकरे यांनी चिंता लगावला. सत्ता त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न आमच्याकडे आणा असं म्हणून राज ठाकरेंनी भेटायला आलेल्या डबेवाल्यांना चिमटा काढला. दरम्यान, या सर्व मागण्यांबाबत मी सरकारशी बोलतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. 

mumbai dabbawala mer MNS chief raj thackeray for their demand of starting locals


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai dabbawala mer MNS chief raj thackeray for their demand of starting locals