पोलिस, हेल्थ वर्कर्स आणि आता कोरोनामुळे डबेवाल्याचाही दुर्दैवी मृत्यू

पोलिस, हेल्थ वर्कर्स आणि आता कोरोनामुळे डबेवाल्याचाही दुर्दैवी मृत्यू

मुंबई : कोरोना संसर्गापासून चार हात दूर असलेल्या मुंबईच्या डबेवल्यांंना ही कोरोना ने आपल्या कवेत घेतले. कोरोनामुळे संतोष जाधव या 39 वर्षीच्या डबेवाल्याचा करून अंत झाला. मुंबईतील डबेवाला संघटनांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.

मालाड येथे राहणारे 39 वर्षीय संतोष रामचंद्र जाधव हे डबेवाले म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप येत होता. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. उपचार सुरू असतांंना त्यांची तब्येत अधिक बिघडल्याने बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई ,वडील,पत्नी व एक मुलगा आहे.

मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने पसरत असला तरी अजुन पर्यंत डबेवाले कोरोना आजारा पासुन दुर होते. परंतु संतोष जाधव यांच्या मृत्युने डबेवाले ही कोरोनाच्या कवेत आल्याचे दिसते. संतोष जाधव यांचे मृत्युने डबेवाल्यांना धक्का बसला आहे.

लॉकडाऊनमध्ये डबेवाल्यांंनीही आपली सेवा थांबवली होती. मात्र तरीदेखील बाधा झाल्याने सर्वांनी काळजी घ्यावी तसेच डबेवाल्यांना काही समस्या आल्यास त्यांनी तात्काळ संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहन मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.

mumbai dabbawala ost his life due to coronavirus read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com