मुंबई - लंडनच्या राजकुमाराच्या विवाहाप्रित्यर्थ डबेवाले वाटणार मिठाई

संजय शिंदे
सोमवार, 14 मे 2018

मुंबई : लंडनचे राजकुमार प्रिन्स हॅरी व हॉलिवुड अभिनेत्री मेगन येत्या 19 मे ला विवाह बंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून मुंबईचे डबेवाले मुंबईत मिठाई वाटणार आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांचे लंडनच्या राजघराण्याशी वेगळे नाते आहे. यापूर्वी देखील डबेवाल्यांशी असलेल्या भावनिक नातेसंबंधांचे भान ठेऊन लंडनच्या राजघराण्याने प्रिन्स चार्ल्स यांचे लग्नात मुंबईच्या डबेवालांना लंडनला बोलावले होते. डबेवालेही त्या शाही सोहळ्यासाठी उपस्थित राहीले होते. डबेवाल्यांचे योग्य ते आदिरातित्थ लंडनच्या राजघराण्याने केले होते.

मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरु केलेल्या रोटी बँकच्या माध्यमातून अनेक भुकेलेल्या लोकांना मोफत अन्न वाटप केले जाते. पण 19 तारीखेला प्रिन्स हॅरी व मेगन यांच्या विवाह निमीत्त भुकेलेल्यांना डबेवाल्यांच्या वतिने रोजच्या अन्नासोबत गोड (मिठाई) देवून त्यांचे तोंड गोड केले जाईल अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.

Web Title: mumbai dabewala distributes sweets on the occasion of marriage of London prince