मुंबईतील डबेवाल्यांची दिंडी पंढरपूरकडे रवाना

Mumbaiche Dabewale
Mumbaiche Dabewale

मुंबई : राज्यभरातून विविध संतांच्या दिंड्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. अशीच एक मुंबई डबेवाल्यांची दिंडी अंधेरी येथून पंढरपूरला रवाना झाली असून एकादशी व द्वादशी निमित्त दोन दिवस पंढरपूर मुक्कामी असणार आहे. त्यामुळे मुंबई डबेवाल्यांची सेवा दोन दिवस बंद राहणार असल्याने मुंबईतील लाखो नोकरदार वर्गाला घरच्या जेवणाऐवजी खाणावळींचा आसरा घ्यावा लागणार आहे. 

मुंबई डबेवाले हे संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पावनभूमी आळंदी व देहू परिसरात जन्मलेले असून उदरनिर्वाहासाठी ते डबे पोहोचवण्याचे काम सेवाभाव वृत्तीने मागील 129 वर्षांपासून करत आहेत. अनेकजण हे वारकरी संप्रदाय मानणारे असल्याने आषाढी व कार्तिक एकादशीला ते न चुकता दिंडी घेऊन आळंदी व पंढरपूरला जातात. यावर्षी ह.भ.प. विलास महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो डबेवाले अंधेरी सातबंगला येथून दिंडी घेऊन पंढरपूरला रवाना झाले आहेत. ते दोन दिवस पंढरपूरला त्यांच्या धर्मशाळेत मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे शुक्रवार,12 व शनिवार, 13 जुलै असे दोन मुंबईतील लाखो नोकरदार वर्गाला घरचे जेवण मिळणार नाही. आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन डबेवाले रविवारी पुन्हा मुंबईत दाखल होणार आहेत. 

पंढरपूर येथे डबेवाल्यांची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत जेवढे वारकरी मुक्कामास येतात, त्या सर्वांची विनामूल्य राहाण्याची व द्वादशीच्या भोजनाची सोय डबेवाल्यांकडून दरवर्षी केली जाते. तशी सोय मुंबईचे डबेवाला संघटनेकडून यंदादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवार व शनिवारी मुंबईत डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे.
दरम्यान, सोमवार, 15 जुलैपासून सेवा सुरळीतपणे चालू राहील, असे मुके यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com