दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; सूसाईड नोट एसआयटीच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

आयआयटी मुंबई संस्थेतील विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस एसआयटीला मोठ यश मिळाले आहे.

Mumbai Crime : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; सूसाईड नोट एसआयटीच्या हाती

मुंबई - आयआयटी मुंबई संस्थेतील विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस एसआयटीला मोठ यश मिळाले आहे. एसआयटीला दर्शनची सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये त्याने एका विद्यार्थ्याने छळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आयआयटी पवईचा विद्यार्थी असलेल्या दर्शन सोलंकीने फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी सहआयुक्त गुन्हे लखमी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती.

जातीवाचक टिप्पणी आणि छळ?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार तपासादरम्यान एसआयटीला दर्शन सोळंकी यांच्या आत्महत्येमागील एक कारण त्यांच्यावरील जातीवाचक टिप्पणी असल्याचे समोर आले आहे. एसआयटीच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, एसआयटीला सोलंकी यांच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये 'अरमानने या सर्वासाठी कारणीभूत असल्याचं स्पष्ट केलं आहे' असे लिहिले आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, अरमान इक्बाल खत्री नावाच्या विद्यार्थ्याचे नाव असून सोलंकी यांचा छळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. सूत्रांनी असेही सांगितले की त्यांनी काही दिवसांमधील व्हॉट्सअॅप चॅट्स देखील तपासले आहेत.

एसआयटीचा तपास

आयआयटी बॉम्बेच्या 18 वर्षीय दर्शन सोलंकी विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येची चौकशीठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला आहे. एसआयटी मृत दर्शन सोलंकीचे पालक, आयआयटी संस्थेचे अधिकारी आणि घटनेचे साक्षीदार असलेल्या विद्यार्थ्यांचे जबाब एसआयटीने नोंदवले आहेत. सोलंकी यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागल्याच्या विविध विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी एसआयटी करत आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

आयआयटी मुंबईतील बीटेक प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने रविवारी 12 फेब्रुवारीला वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मृत दर्शन सोळंकीची बहीण जान्हवी सोळंकीने घटनेच्या दिवशी दर्शनने त्याच्या बहिणीशी आणि कुटुंबीयांशी कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाबद्दल आरोप केले होती. फोनवर दर्शनने त्याचे मित्र त्याच्या जातीमुळे भेदभाव करत असल्याचा दर्शनच्या बहिणीला माहिती दिली. जानेवारी महिन्यात दर्शन अहमदाबाद येते घरी आल्यावरही त्यांने कॅम्पसमधील जातिभेदाबद्दल कुटुंबियांना सांगितले होते. जेव्हा दर्शनच्या मित्रांना समजले की तो अनुसूचित जातीचा आहे, तेव्हा त्यांचे त्याच्याबद्दलचे वागणे बदलले, त्यांनी बोलणे बंद केल्याचा आरोप मृत दर्शनच्या बहिणीने केला आहे. तसेच या प्रकरणी आयआयटीच्या विद्यार्थी संघटनांनी सुध्दा या प्रकरणी जातीयवादाचा मुद्दा उपस्थित केला होता.

टॅग्स :crimeMumbaiSIT