मुंबई 31 डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - स्वच्छ भारत अभियानानुसार मुंबईतील सर्व वॉर्ड 31 डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 18 वॉर्डांमध्ये शौचालये सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित सहा वॉर्डही काही दिवसांत हागणदारीमुक्त करण्यात येतील, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 15 डिसेंबरपर्यंत सर्व वॉर्ड हागणदारीमुक्त करण्याचा आदेश पालिकेच्या सहायक आयुक्तांना दिला होता. आतापर्यंत 18 वॉर्डांतच पुरेशी शौचालये बांधण्यात आली आहेत. आता सहा वॉर्डांमध्येही 31 डिसेंबरपर्यंत शौचालये बांधण्यात येतील आणि नव्या वर्षाच्या आदल्या दिवशीच आयुक्त मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई महापालिकेने आतापर्यंत दीड हजारहून अधिक शौचकूप बांधले आहेत. त्यामुळे ते भाग हागणदारीमुक्त झाले आहेत. जेथे शौचालये नाहीत, तेथे फिरती शौचालये पुरवण्यात येणार आहेत.

Web Title: Mumbai, December 31 haganadari free