मुंबई-दिल्ली प्रवास वेगवान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

मुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’ इंजिन लावल्यानंतर आणखी २० ते २५ मिनिटे वाचतील. 

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या नव्या राजधानी एक्‍स्प्रेसला रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला.

या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राज पुरोहित, आशीष शेलार, प्रशांत ठाकूर, कॅप्टन तमिल सेलमन, खासदार गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत आदी उपस्थित होते. या गाडीची तिकिटे अवघ्या पाच तासांत विकली गेली. ही गाडी कल्याण, नाशिक, जळगावमार्गे मध्य प्रदेशातून दिल्लीला जाणार आहे. या मार्गावरून जाणारी ही सर्वांत वेगवान रेल्वेगाडी आहे. दिल्लीत दाखल होण्यास पश्‍चिम रेल्वेवरील राजधानी एक्‍स्प्रेसला १५ ते १६ तास आणि मध्य रेल्वेवरील गाड्यांना किमान २४ तास लागतात. मध्य रेल्वेवरील नवीन राजधानी एक्‍स्प्रेस हा पल्ला १८ ते १९ तासांत गाठेल. 
 
दोन्ही ‘राजधानीं’त स्पर्धा व्हावी 
पश्‍चिम रेल्वेवरील ‘राजधानी’ला दिल्लीला पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो. मध्य रेल्वेवरील ‘राजधानी’चा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दोन गाड्यांतील स्पर्धा पाहायला आवडेल, असे रेल्वेमंत्री म्हणाले.

Web Title: Mumbai-Delhi travel fast