मुंबईत डेंग्यूचे थैमान; गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पटीने रुग्णवाढ | Mumbai Dengue patients update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue patients

मुंबईत डेंग्यूचे थैमान; गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पटीने रुग्णवाढ

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबई (Mumbai) शहरात डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये (Dengue fever) सहा पटीने वाढ झाली आहे. सध्या कोरोना महामारीचा (corona pandemic) जोर कमी झाला असून पावसाळी आजारांच्या (monsoon diseases) रुग्णांची विक्रमी नोंद होत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार (BMC Report), डेंग्यूचे रुग्ण महामारीपूर्वीसारखे आढळत आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे डेंग्यूमुळे होणारे मृत्यू एक (Dengue patients death) अंकी नोंदले गेले आहेत. पालिकेने पावसाळ्याशी संबंधित जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डेंग्यूचे रुग्ण गेल्यावर्षी 129 एवढे होते ते या वर्षी 821 वर पोहोचले आहेत. डेंग्यूसारख्याच डासामुळे पसरणाऱ्या चिकुनगुनियाच्या रुग्णांनीही वाढ दर्शवली आहे.

हेही वाचा: सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स; अनिल देशमुख प्रकरणात होणार चौकशी

मृत्यूंचे प्रमाण कमी

एकूणच, पावसाळ्यातील आजारांनी या वर्षी सात जणांचा बळी घेतला, 2020 मध्ये 12 आणि 2019 मध्ये 20 जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत शहरात डेंग्यूचे 821 रुग्ण आणि 3 मृत्यूची नोंद झाली असून गेल्या वर्षी ही संख्या कित्येक पटीने कमी होती.  गेल्या वर्षी डेंग्यूच्या 129 रुग्णांची नोंद आणि 3 मृत्यू झाले होते. 2019 मध्ये 920 आणि 2018 मध्ये 1,003 एवढे डेंग्यूचे रुग्ण होते. 2020 मध्ये चाचण्यांमध्ये मोठी घट नोंदली गेली. शिवाय, लाॅकडाऊनमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे लोक ही बाहेर फीरकत नव्हते, गेल्या वर्षी कमी संख्येची नोंद होण्यामागे ही प्रमुख कारणे होती.

पालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर म्हणाले, “ या घटकांसह अधूनमधून पडणारा पाऊस आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे रुग्ण पुन्हा नेहमीसारखी नोंदले गेले आहेत. डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी घरात डासांची पैदास हे सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच, मुंबईतील झोपडपट्टी भागात 18 लाखांहून अधिक ड्रममध्ये पाणी साठवून ठेवले जाते. त्यापैकी प्रत्येक एक संभाव्य स्त्रोत असू शकतो.

डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्ती डासामुळे होणारा आणखी एक विषाणूजन्य आजार चिकनगुनियामध्ये 60 रुग्णांची वाढ झाली आहे. पालिकेने सांगितले की 2021 मध्ये याच आजारात जास्त वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, हिपॅटायटीस ए मध्ये मोठी घट झाली आहे. यावर्षी 258 रुग्णांची नोंद झाली असून 2020 मध्ये 263 नोंद झाली होती.

loading image
go to top