आदित्य ठाकरेंचे आरोप पालिकेने फेटाळले; विकास कामे-निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार नसल्याचा दावा

Aditya Thackeray
Aditya Thackeray

मुंबई - पालिकेच्या विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये तसेच निविदांमध्ये अनियमिता असून गैरव्यवहार झाल्याचा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने फेटाळले आहेत. पालिकेच्या कामांमध्ये, निविदा प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमिता नसून उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Aditya Thackeray
मोठी बातमी! मुंबईत 6 ठिकाणी 'डी' कंपनीशी संबंधीतांच्या ठिकाणांवर NIAची छापेमारी

आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या कामकाजात व काढलेल्या निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत आदित्य ठाकरे यांनी नुकतीच रमेश बैस यांची भेट घेऊन लोकाआयुक्तांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांचे आरोप पालिकेने फेटाळले असून कामकाजात व निविदांमध्ये कोणतीही अनियमितता, गैरव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर, राज्य शासनाने पालिकेवर प्रशासक चहल यांची नियुक्ती करून सर्व अधिकार त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

Aditya Thackeray
Shahaji Patil : संजय राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका; शहाजी पाटलांची झणझणीत टीका

पालिका अधिनियमानुसार पालिकेच्या सर्व समित्यांचे अधिकार आता प्रशासक म्हणून आयुक्तांकडे दिले आहेत. हे सोपवलेले अधिकार योग्यपणे वापरुन प्रशासकांकडून कर्तव्य, जबाबदा-या निभावले जात आहेत. शासनाकडून विहित प्रक्रियेचे पूर्णपणे पालन करुन प्रशासनाकडून कामकाज सुरु असतानाही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केले जात आहेत.

महानगरपालिका प्रशासनात आर्थिक गैरव्यवहार, अनागोंदी, अनियमितता, कंत्राटदारांची मर्जी याअनुषंगाने करण्यात येणारे सर्व आरोप अत्यंत गैरलागू असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

रस्ते कामांसाठी, पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार निविदा मागविल्या आहेत. त्यामध्ये सर्व नियमांचे पालन करुन कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याबाबतचे सविस्तर विवेचन तसेच पत्रव्यवहार याद्वारे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून माहिती दिली जात नाही, पत्र दिले जात नाही, या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com