तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर पडेल महागात

तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर पडेल महागात

मुंबई: ब्रेन एन्युरिजम हा मेंदूचा विकार असणाऱ्या 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर यशस्वी उपचार करण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आले आहे. आशियात पहिल्यांदाच कॉन्टूर डिव्हाइस प्रक्रियेचा वापर करून उपचार करण्यात आले आहेत.
या महिलेला तीव्र डोकेदुखीची समस्या होती. मात्र या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केल्यानं त्रास वाढला. या महिलेवर कॉन्टूर डिव्हाइस वापरून एक प्रक्रिया करण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे महिलेला होणारी तीव्र डोकेदुखीची समस्या दूर होऊन तिला नवीन आयुष्य मिळाले आहे. परळच्या ग्लोबल रूग्णालयातील एन्डोव्हास्क्यूलर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही प्रक्रिया यशस्वी केली.

कांचन डारगे या महिलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर काही क्षणासाठी ठिक वाटायचे. मात्र पुन्हा डोकेदुखी व्हायची. वेदना असहय होऊ लागल्याने 2017 मध्ये त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी महिलेच्या उजव्या बाजूच्या मेंदूत एन्युरिजमसाठी ओपन ब्रेन शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतरही महिलेच्या डाव्या बाजूला शरीराला लकवा मारल्यासारखे झाले होते. बोलतानाही अडचण येत होती. अशा स्थितीत काही महिन्यांपूर्वी या महिलेला ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी शस्त्रक्रिया न करता केवळ कॉन्टूर डिव्हाइसचा वापर करून उपचार करण्यात आले आहे.

तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष पडेल महागात

एन्डोव्हास्क्यूलर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, ‘‘या महिलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय तपासणीत या महिलेला ब्रेन एन्युरिजम हा मेंदूशी संबंधित विकार असल्याचे निदान झाले. याशिवाय ही महिला कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचेही समोर आले होते. तिला कोविड आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सरकारच्या कोविड-19 प्रोटोकॉलचा वापर करून या महिलेवर कॉन्टूर डिव्हाइस वापरून एक प्रक्रिया करण्यात आली. एन्युरिझमातील रक्त प्रवाह थांबवण्यासाठी ही प्रक्रिया अतिशय फायदेशीर आहे. साधारणतः दोन तास ही प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अधिक दिवस तीव्र डोकेदुखी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नयेत. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.’’

मेंदूच्या एन्युरिझम म्हणजे काय

मेंदूच्या एन्युरिझम (ज्याला सेरेब्रल एन्युरिझम किंवा इंट्राक्रॅनियल एन्युरिझम देखील म्हणतात) मेंदूतील रक्तवाहिनीच्या भिंतीच्या कमकुवत भागामध्ये उद्धवणारी फुग्यासारखा भाग आहे. जर मेंदूत एन्युरिझमचा विस्तार झाला आणि रक्तवाहिन्याची भिंत खूप पातळ झाली तर, एन्युरिझम फुटू शकतो. यामुळे मेंदूच्या आजूबाजूच्या जागेत रक्त वाहू शकते. अशा स्थितीत जीवाला धोका संभवू शकतो. अचानक डोकेदुखी होणं आणि तंद्री येणं ही यामागील लक्षणं आहे. ब्रेन एन्युरिझम हा आजार बऱ्याच कारणांमुळे उद्धवू शकतो. अनुवांशिकता, उच्च रक्तदाब आणि असामान्य रक्तप्रवाह हे या आजाराचे प्रमुख कारण आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Doctors successfully treated woman Corona positive brain aneurysm

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com