मुंबईला कोयनेचा एक थेंबही देणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

मुंबई - "जोपर्यंत कोकणची तहान भागत नाही, कोकणातला सिंचनाचा प्रलंबित अनुशेष दूर केला जात नाही, तोपर्यंत कोयनेच्या पाण्याचा एक थेंबसुद्धा मुंबईला देणार नाही,‘ असा सणसणीत इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सरकारला दिला. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे रामदास कदम यांच्या या इशाऱ्याने नवा वाद पेटण्याचे संकेत आहेत. 

कोकण सिंचन अनुशेषासंदर्भात कदम यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून किमान पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. मुंबईची भविष्यातील पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी कोयनेचे समुद्राला वाहून जाणारे 67 टीएमसी पाणी मुंबईला आणण्याचा मानस जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधिमंडळात जाहीर केला होता. मात्र, या घोषणेलाच कदम यांनी आक्षेप घेत घरचा आहेर दिला आहे. राज्यभरात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील दिला जात आहे. मात्र, कोकणातल्या सिंचन अनुशेषाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याची नाराजी कदम यांनी व्यक्‍त केली. 

सध्या विदर्भात 9 टक्‍के, मराठवाड्यात 9 टक्‍के, पश्‍चिम महाराष्ट्रात 14 टक्‍के सिंचन क्षेत्र आहे. मात्र, कोकणात केवळ 1 टक्का एवढेच सिंचन निर्माण झाल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. कोकणातला सिंचन अनुशेष कायमचा दूर करून कोकणातल्या जनतेला शाश्‍वत सिंचन सुविधा द्यायची असेल, तर अपूर्ण व प्रलंबित 150 पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा, त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्‍यक असल्याची भूमिकाही कदम यांनी स्पष्ट केली. 

कदम म्हणाले... 

कोकण सिंचन अनुशेष दूर करा 

पाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्या 

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र 

Web Title: Mumbai does not have a drop of koyana