esakal | Dombivali: थकबाकी भरल्याने 161 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

डोंबिवली : थकबाकी भरल्याने 161 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : महावितरणची बिले थकविल्याने कल्याण परिमंडळातील सुमारे 15 हजार ग्राहकांचा वीज पूरवठा महावितरणने कायमस्वरूपी खंडित केला होता. या ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालत मध्ये महावितरणच्या नियमानुसार मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणने केले होते. अखेर 161 ग्राहकांनी याचा लाभ घेत 39 लाख 44 हजाराची थकबाकी भरल्याने त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

कल्याण परिमंडलातील जवळपास 15 हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. परंतू 161 प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व 39 लाख 44 हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवलीत 25, कल्याण पश्चिमेत 16 आणि कल्याण पूर्व विभागात 12 अशा एकूण 53 ग्राहकांनी थकीत 23 लाख 57 हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत 10 लाख 24 हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या 47 ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. यात उल्हासनगर न्यायालयात 26 व कल्याण येथील न्यायालयात 21 प्रकरणांचा समावेश आहे. वसई मंडलांतर्गत वसई व विरामधील 61 ग्राहक लोक अदालतीत सहभागी झाले. परंतू 13 प्रकरणांमध्ये 2 लाख 90 हजार रुपयांची वसूली होऊ शकली. पालघर मंडलात सर्वाधिक 194 ग्राहकांनी सहभाग नोंदवला. यातील 48 ग्राहकांनी 2 लाख 73 हजार रुपयांचा भरणा करून आपली प्रकरणे निकाली काढली.

लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधिक्षक अभियंते, सहायक विधी अधिकारी राजीव वामन, शिल्पा हन्नावार, उपविधी अधिकारी दीपक जाधव यांनी प्रयत्न केले

loading image
go to top