Mumbai : कार चालकाने दिली तिघांना धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident case

Mumbai : कार चालकाने दिली तिघांना धडक

डोंबिवली : कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि एका दुचाकी स्वरासह दोन पादचाऱ्यांना गाडीने जोरदार धडक दिल्याची घटना डोंबिवलीत दुपारी घडली. यात पादचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत.

डोंबिवली पुर्वेतील पाथर्ली परिसरात शनिवारी दुपारी हा अपघात घडला. कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने त्याने एका दुचाकी स्वारासह दोन नागरिकांना धकड दिली.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. याबाबत टिळकनगर पोलिसांना विचारले असता त्यांनी अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही असे सांगितले. तर स्थानिक नागरिकांनी या अपघातात दोन तीन जण किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगितले.