जामिनाच्या अटी शिथिल करण्यासाठी आर्यन खानची मुंबई हायकोर्टात याचिका

Aryan khan
Aryan khansakal media

मुंबई : अमलीपदार्थ प्रकरणात (Mumbai drug case) जामिनावर असलेल्या आर्यन खानने (Aryan khan) जामिनाच्या अटी (Bail conditions) शिथिल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका (Petetion) केली आहे. उच्च न्यायालयाने सुपरस्टार शाहरुख खानच्या (shahrukh khan) मुलाला जामीन मंजूर केला आहे. यामध्ये दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्दोष दिले आहेत. मात्र आता एनसीबीने (NCB) या प्रकरणाचा तपास दिल्लीमधील विशेष तपास पथकाला दिला आहे.

त्यामुळे मुंबई कार्यालयात जाण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मी जेव्हा हजेरी लावायला जातो तेव्हा मला पोलीस संरक्षण घ्यावे लागते कारण मीडियाचे अनेक प्रतिनिधी हजर असतात असेही अर्जामध्ये म्हटले आहे. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. कॉर्डिलीया क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात आर्यनला एनसीबीने अटक केली होती. उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

तसेच त्याच्या विरोधात काही पुरावे दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. एनसीबी कार्यालयात हजेरी लावणे, पारपत्र जमा करणे, परदेशात विनापरवानगी न जाणे, मीडियावर न बोलणे इ. चौदा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. एनसीबीने या प्रकरणात चौदाजणांना अटक केली होती. सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com