कुरिअरमधून ड्रग्सची तस्करी; दोन तस्कर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smuggler Arrested

मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात दोन तस्करांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.

Drugs Smuggling : कुरिअरमधून ड्रग्सची तस्करी; दोन तस्कर अटकेत

मुंबई - मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात दोन तस्करांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी ड्रग सिंडीकेटचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. कुरिअरमधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या देशात भारतातून अमली पदार्थांच्या तस्करीचा डाव या आरोपींचा होता.परंतु त्या पूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या. या पूर्वी आरोपींनी कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलिया आणि यूकेला काही प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली होती.मुंबईतून दर आठवड्याला 10 किलो केटामाईन ड्रग्सची विदेशात तस्करी केली जात होती.

अमली पदार्थ गुजरातमधून मुंबईत आणण्यात येत होते. तेथून पॅक करून परदेशात परदेशात पाठवले जात होते. प्राथमिक तपासात हे तस्कर आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग असून ते ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी मुंबईत आले असल्याचा पोलीस तपासात समोर आले आहे.

यापूर्वी 16 मार्च रोजी, मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने अंधेरी परिसरातून 8 कोटी रुपये किमतीचे 15.743 किलो केटामाइन ड्रग जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती.अटक करण्यात आलेला आरोपी अमली पदार्थ ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला कुरिअरद्वारे पाठवत असे.