
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी नवीन समन्स बजावले आहे.
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांना ईडीचे समन्स
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी नवीन समन्स बजावले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात 24 मार्च रोजी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी होणार आहे. मुश्रीफ हे कोल्हापुरात दाखल झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची ईडी चौकशीला करत आहे. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांची 24 मार्च रोजी पुन्हा चौकशी केली जाणार आहे.
या पूर्वी हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. यावेळी मुश्रीफ यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे पत्र दिले. या पत्रात चौकशी दरम्यान काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे आहेत.
आरोप काय?
अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवायला दिला गेला. या दोन कंपन्यांमध्ये 2020 मध्ये करारा झाला होता. हसन मुश्रीफ यांचे जावई या कंपनीचे मालक होते. कंपनीच्या मालकांना अनुभव नसतानाही हा करार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कोलकाता येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. या संदर्भाने मुश्रीफ यांच्या घरावर सलग दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अनेक आरोप केले होते.