
Mumbai News : महाराष्ट्रातील व्यावसायिकांना एक उत्तम व्यासपीठ जाहीर
मुंबई : महाराष्ट्रातील व्यावसायिकांना एक उत्तम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. एआयपीसी महाराष्ट्र या युनिटची आज घोषणा करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत सुमेध गायकवाड अध्यक्षपदी, डॉ. गार्गी सपकाळ उपाध्यक्षपदी तर अक्षय सुरेखा विजय कुलकर्णी यांची सचिवपदावर निवड करण्यात आली आहे.
महेश पाटील सदस्यत्व आणि एंगेजमेंट, तारिक बागवान एमपीसीसी आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन समन्वय, डॉ. श्रीकांत तिवारी वैद्यकीय आणि आरोग्यसेवा प्रोफेशनल्स, निलिमा राऊत महिला सक्षमीकरण, रोहित देशमुख शेतकरी हक्क आणि कल्याण,
ॲड. सागर वागुळ कायदा आणि आरटीआय सेल, नेहा राणे धोरण आणि संशोधन, अक्षय शिंपी कला, साहित्य आणि संस्कृती, शाम कोन्नूर विविधता आणि समावेश, पवन देशमुख एमएसएमई, ज्योती शुक्ला आउटरीच मीडिया आणि सोशल मीडिया,
सुधीर मोरे आयटी सेवा प्रोफेशनल, नितीन हत्तीअंबिरे टिचिंग फॅसिलिटी प्रोफेशनल, साकिब शेख अल्पसंख्याक आउटरीच बिनू वर्गीस स्टार्ट-अप्स आणि इनोव्हेशन, राजस भांबुरे ॲडमिनिस्ट्रेशन या पदावर विराजमान झाल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ शशी थरूर यांच्या मार्फत काढलेल्या परिपत्रकात जाहीर करण्यात आले आहे.